कार्तिकी एकादशीच्या विठूरायाच्या महापूजेचा मान कुणाला? फडणवीस की अजित पवार?
VIDEO | राज्याला दोन उपमुख्यमंत्री असल्याने कार्तिकी एकादशीला पंढरपूर येथील विठूरायाची महापूजा कोण करणार? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. इतकेच नाहीतर मंदिर समितीसमोर देखील हा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे महापूजा फडणवीस की पवार करणार? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे
मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३ | पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीची महापूजा नेमकं कोण करणार याच्या चर्चा सध्या होताना दिसताय. दरवर्षी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही महापूजा केली जाते. मात्र यावेळी राज्याला दोन उपमुख्यमंत्री असल्याने देवेंद्र फडणवीस की अजित पवार कुणाच्या हस्ते ही पूजा होणार? असा पेच मंदिर समितीला देखील पडलेला आहे. आगामी कार्तिकी यात्रेच्या नियोजनासाठी पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची बैठक संपन्न झाली. कार्तिकी एकादशी गुरूवार, दिनांक २३ नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी पहाटे २:२० वाजता उपमुख्यमंत्री, मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापुजा केली जाते. ही महापूजा ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर आषाढीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांचे हस्ते केले जाते. मात्र राज्याला दोन उपमुख्यमंत्री असल्याने कोणत्या उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पूजा होणार हे मात्र अजून निश्चित झालेले नाही. विधी व न्याय विभागाशी चर्चा करून पुढील आठवड्यामध्ये याबाबत निर्णय घेतला जाईल, असे मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी म्हटले.