शिरूरचा सामना कुणात रंगणार? वळसे पाटलांच्या लेकीची शिरूरमधून राजकारणात एन्ट्री?
शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतून अमोल कोल्हे यांचं नाव जवळपास निश्चित झालंय. मात्र महायुतीकडून कोणता उमेदवार असणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. अजित पवार गटाकडून दोन आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून एक नाव चर्चेत
मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४ : शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतून अमोल कोल्हे यांचं नाव जवळपास निश्चित झालंय. मात्र महायुतीकडून कोणता उमेदवार असणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. अजित पवार गटाकडून दोन आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून एक नाव चर्चेत आहे. त्यामुळे शिरूर लोकसभेचा सामना नेमका कुणात रंगणार? याचीच चर्चा सध्या रंगतेय. २०१९ ला सर्वाधिक चर्चेत असलेल्या लोकसभा निवडणुकीपैकी शिरूर लोकसभा आघाडीवर होते. एकीकडे १५ वर्ष खासदार राहिलेले आढळराव पाटील होते तर दुसरीकडे पहिल्यांदाच खासदारकीला उतरलेले अमोल कोल्हे होते. यंदा दोन्ही उमेदवारांच्या पक्षांचे दोन तुकडे झालेत. आता शिवाजी अढळराव हे शिंदेंच्या शिवसेनेत आहे तर अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहे. दरम्यान, अढळराव हे शिंदेंच्या गटात केल्यानं शिरूरची जागा अमोल कोल्हे हेच लढवणार असल्याचा दावा केला जातोय, बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट