Special Report | एकनाथ शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार? धक्कातंत्राचीही शक्यता, पाहा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Jul 02, 2022 | 10:22 PM

शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपचं सरकार राज्यात स्थापन झाल्याने या गटाला दोन मंत्रिपद केंद्रात मिळणार आहेत. या दोन्ही मंत्रिपदासाठी जी नावं चर्चेत आहेत. ते एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे आहेत. शिंदे गटाकडून केंद्रात मंत्रिपदासाठी दीपक केसरकर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव सध्या आघाडीवर आहे. मात्र, यामध्ये धक्कातंत्रही पहायला मिळू शकतं.

मुंबई : दोन दिवसांपूर्वीचा राज्यात मोठं सत्तांतर पार पडलंय. या सत्तातरानंतर नव्या मंत्रिमंडळासाठीही (Cabinet) लगबग सुरू आहेत. राज्यात अनेक आमदार हे नव्या मंत्रिमंडळात बसण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर एकनाथ शिंदे गटातील (Eknath Shinde) दोन नेत्यांची केंद्रातही मंत्रिपदी वर्णी (Central Minister) लागणार आहे. शिवसेना आणि भाजपची युती होती तेव्हा शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी तयार झाल्याने अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला होता. मात्र, आता शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपचं सरकार राज्यात स्थापन झाल्याने या गटाला दोन मंत्रिपद केंद्रात मिळणार आहेत. या दोन्ही मंत्रिपदासाठी जी नावं चर्चेत आहेत. ते एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे आहेत. शिंदे गटाकडून केंद्रात मंत्रिपदासाठी दीपक केसरकर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव सध्या आघाडीवर आहे. मात्र, यामध्ये धक्कातंत्रही पहायला मिळू शकतं.

 

Published on: Jul 02, 2022 10:11 PM
एकनाथ शिंदें गट मुंबईत पोहचला; भाजप नेते गिरीष महाजन यांची प्रतिक्रिया – काय म्हणाले ते पाहा व्हिडिओ
Video : भाजप आमदार एकनाथ शिंदे गटाच्या आमदाराचे स्वागत करण्यासाठी थांबलेले