8 एप्रिलच्या दरम्यान अजित पवारांना पित्ताचा त्रास झाला. त्या त्रासानंतर अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांची सुरुवात झाली. विचारधारांच्या जर-तरच्या अटीवर शिंदे-भाजपच्या नेत्यांनी जाहीरपणे अजित पवारांना ऑफरही दिली. इकडे शरद पवारांनी भाकरी फिरवण्याचं सांगत राजीनामा दिला. त्यानंतर 2 दिवसांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर मागेही घेतला.
राष्ट्रवादीतला पवार प्ले थांबलाय, की मग नवा पॉवरप्ले सुरु झालाय, याचीही चर्चा होतेय. जवळपास सर्व बडे नेते आणि कार्यकर्ते शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याला विरोध करतायत. तर अजित पवार तो निर्णय योग्य असल्याचं सांगतायत.
नॉट रिचेबलवरुन माध्यमांनी नाहक बदनामी करु नये, असा सल्ला अजित पवारांनी माध्यमांना दिलाय. अजित पवार 7 आमदारांसह नॉट रिचेबल झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र ती निव्वळ अफवा असल्याचं समोर आलंय. मात्र अदानी समुहावरचे आरोप आणि ईव्हीएम मशीन या दोन्ही मुदद्यांवर राष्ट्रवादीनं घेतलेल्या भूमिका चर्चेत आहे.
राज्यघटना, दहाव्या सुचीचा अर्थ आणि अन्वयार्थ, स्वायत्त संस्था, त्यांचे अधिकार, अधिकार वापरण्याची स्थिती, कारवाई प्रलंबित असताना अधिकाराचा वापर आणि राज्यपालांनी कोणत्या स्थितीत बहुमत चाचणी बोलवावी? या मुद्द्यांवर कोर्टात खल रंगला.
शिवसेनेच्या (Shiv Sena) चिन्हाचा फैसला झाल्यास दुसऱ्याच दिवशी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं विधान आमदार बच्चू कडूंनी (Bachchu Kadu) केलंय. त्यामुळे शिंदे सरकारचं दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद या शिंदे गटात सामील होणार आहेत.
वादाचा विषय होता गुवाहाटीत 50 खोके घेतल्याच्या आरोपांचा. मात्र त्यावर बोलताना सत्तारांनी गलिच्छ शब्द उच्चारला, आणि त्यावर स्पष्टीकरण देताना पुन्हा तोच शब्द वारंवार वापरला.
फक्त हिऱ्यांचा व्यवसाय पाच लाख रोजगार देतो.. मात्र ज्या हिऱ्यासाठी इतिहासात राजवटी लुटल्या गेल्या, खून झाले., कपट-कारस्थानं रचली गेली. आणि जो आजही जगातला सर्वात मौल्यवान हिरा आहे, तो भारतात येणार का., हा प्रश्न अनुत्तरित आहे..
Tanaji Sawant : या दौऱ्यात नेमकं असं काय आहे, आणि विरोधक त्यावर टीका का करु लागले आहेत, असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे. शनिवारी दिवसभर सोशल मीडियात आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा दौऱ्यावर कल्ला रंगला.