संभाजीनगरात कुणाला मिळणार जागा? ठाकरे गट अन् महायुतीकडून कुणाला मिळणार उमेदवारी?

| Updated on: Mar 14, 2024 | 12:18 PM

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाकडून लोकसभेच्या रिंगणात कोण उतरणार याबाबत संभ्रम कायम आहे. दरम्यान, चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून तयारी सुरू

मुंबई, १४ मार्च २०२४ : संभाजीनगरमध्ये उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच चंद्रकांत खैरे यांनी प्रचार कार्यालयाचं स्तंभपूजन करत अधिकृत प्रचाराला सुरूवात केली आहे. मात्र त्यांचेच सहकारी अंबादास दानवे हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. तर भाजपच्या २० उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आी पण त्यामध्ये संभाजीनगरचं नाव नाहीये. त्यामुळे संभाजीनगरची जागा नेमकी कुणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाहीये. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाकडून लोकसभेच्या रिंगणात कोण उतरणार याबाबत संभ्रम कायम आहे. दरम्यान, चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांनी प्रचारसभा घेत निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. मात्र संभाजीनगरमध्ये कोण कोणाविरूद्ध लढणार हे अद्याप स्पष्ट नाही. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Mar 14, 2024 12:18 PM
नाशिक लोकसभेवर दावा करत श्रीकांत शिंदेंच्या ‘त्या’ घोषणेची भाजपनं काढली हवा
राज ठाकरेंचा हात सोडल्यानंतर वसंत मोरेंना ऑफरवर ऑफर, तात्या कोणाचा झेंडा हाती घेणार?