BJP New President : जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपा नवा अध्यक्ष कोण? ‘ही’ नावं आघाडीवर

| Updated on: Mar 31, 2025 | 12:46 PM

दरम्यान, आता बिहार राज्याची निवडणूक होणार असून भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनापूर्वी भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड झाल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक होणार असल्याचे सांगितले जात आहे.

भारतीय जनता पक्षाला याच आठवड्यात नवा अध्यक्ष मिळणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पक्षाच्या स्थापना दिनापूर्वीच अध्यक्ष जाहीर करण्यावर भाजपचा भर आहे. संघटनात्मक नाव नोंदणी पूर्ण झाल्याने अध्यक्षांचं नवा जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदासाठी विनोद तावडे, धर्मेंद्र प्रधान, पुरंदरेश्वरी आणि भूपेंद्र यादव यांची नाव आघाडीवर असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरापासून भाजपच्या नव्या अध्यक्षपादासाठी प्रक्रिया ही सुरू आहे. संघटनात्मक नाव नोंदणीसह पदाधिकाऱ्यांच्या निवडी देखील पूर्ण झाल्याची माहिती मिळतेय. अशातच ६ एप्रिल रोजी भाजपचा स्थापना दिवस असून त्यापूर्वी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नाव जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. तीन राज्यांमधील निवडणुकीतील विजयामुळे उत्साहित झालेल्या भाजपने आता जेपी नड्डा यांच्या उत्तराधिकारी म्हणून नवीन पक्षाध्यक्षाचा शोध नव्याने सुरू केला आहे. भाजप अध्यक्षांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. परंतु जेपी नड्डा २०१९ पासून या पदावर आहेत. पण आता नवा अध्यक्ष नेमण्यात येण्याची चर्चा होताना दिसतेय.

Published on: Mar 31, 2025 12:45 PM
आता मुंबईतच सिंगापूर… निसर्गाच्या सान्निध्यात भटकंतीचा पहिलाच ‘उन्नत मार्ग’ आजपासून खुला
Raj Thackeray : ‘हा विषय फक्त खंडणीला विरोध केल्याचा होता, पण..’; देशमुख हत्या प्रकरणी राज ठाकरेंचं मोठं विधान