Baramati Constituency : बारामतीत काका की पुतण्या, कोण पॉवरफुल? ‘या’ 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी कोणती?

| Updated on: Nov 21, 2024 | 11:17 AM

पश्चिम महाराष्ट्रात जो नेहमी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे तो यंदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कौल देणार की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला कौल देणार? याकडे साऱ्या महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत.

महाराष्ट्रात एकूण ४० जागांवर राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी असा सामना सध्या सुरू झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात जो नेहमी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे तो यंदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कौल देणार की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला कौल देणार? याकडे साऱ्या महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेनेप्रमाणे यंदा दोन्ही राष्ट्रवादीतही ४० जागांवर सामना आहे. त्यामुळे पवार काका – पुतण्याच्या लढाईत कोण कोणावर वरचढ ठरेल याचा फैसला या ४० जागांवरचे निकाल ठरवतील. मुंबईच्या अणुशक्तीनगर मतदारसंघात अजित पावर यांच्या राष्ट्रवादीचे सना मलिक यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे फहाद अहमद, श्रीवर्धन येथून अजित पावर यांच्या राष्ट्रवादीचे अदिती तटकरे यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अनिल नवगणे, आंबेगाव मतदारसंघात अजित पावर यांच्या राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे देवदत्त निकम, शिरूर येथे अजित पावर यांच्या राष्ट्रवादीचे अशोक पवार यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर कटके, इंदापूर येथे अजित पावर यांच्या राष्ट्रवादीचे दत्ता भरणे यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे हर्षवर्धन पाटील यांच्या विधानसभेचा सामना रंगला. बघा आणख्या कोणत्या इतर जागांवर अजित पावर यांची राष्ट्रवादी विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आमने-सामने आली.

Published on: Nov 21, 2024 11:17 AM
Vidhan Sabha Election Exit Poll 2024 : महायुती अन् मविआमध्ये काँटे की टक्कर, मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?
Shivsena : खरी शिवसेना कोणाची? एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरेंची ‘या’ 51 जागांवर जनतेचा फैसला