च्यामारी… बैल हाय की पैलवान? धान्य, शेंगपेंड अन् रोज 15 अंड्याचा खुराक… कृषी प्रदर्शनात हंबरणाऱ्या ‘सोन्या’चीच चर्चा
शरद कृषी प्रदर्शनात सांगलीच्या जत तालुक्यातील उमराणी मधील डाॅ विद्यानंद आवटी यांचा ६ फुटांचा भलामोठा बैल सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. या प्रदर्शनात या बैलाची शेतक-यांमध्ये मोठी चर्चा होताना पाहायला मिळतेय.
सातारा, १७ फेब्रुवारी २०२४ : साता–यातील लोणंदमध्ये डाॅ नितीन सावंत यांनी शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या शरद कृषी प्रदर्शनात सांगलीच्या जत तालुक्यातील उमराणी मधील डाॅ विद्यानंद आवटी यांचा ६ फुटांचा भलामोठा बैल सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. या प्रदर्शनात या बैलाची शेतक-यांमध्ये मोठी चर्चा होताना पाहायला मिळतेय. हा बैल खिलार जातीचा असून याचं वय साडे चार वर्ष आहे . सोन्या नावाच्या या बैलाला सहा प्रकारचं धान्य, शेंगपेंड, रोज १५ अंडी, करडईचं १ लिटर तेल याला पाजलं जातं तसंच याला रोज दोन लिटर दूध सुद्धा दिलं जातं. या बैलाला महिन्याला ५० हजारांचा खर्च होतो तर महिन्याला हा बैल तीन लाख रुपये कमावतो या सोन्या बैलाला ४१ लाख रुपयांना मागणी आली होती तरी सुद्धा याला विकायला मालक विद्यानंद आवटी यांनी नकार दिला आहे.
Published on: Feb 17, 2024 01:00 PM