विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज केलेल्या उमेदवारांना आज दुपारी ३ वाजेपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तर यानंतर प्रत्येक मतदारसंघातील लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे. तर मविआ आणि महायुती बंडखोरी रोखण्यात यशस्वी होणार का? हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. महायुतीतून काही नेत्यांना पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला होता. बोरिवलीतून गोपाळ शेट्टी यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. हिंगोलीतील भाजपचे बंडखोर नेते रामदास पाटील सुमटानकर, विक्रमगडचे शिंदे गटाचे उमेदवार प्रकाश निकम हे नॉट रिचेबल आहेत. बोईसरचे शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार जगदीश धोडी ४ दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. पालघरचे भाजपचे बंडखोर उमेदवार अमित घोडा हे २ दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. आणखी कोण बंडखोरी करण्याच्या तयारीत? कोण लढणार अपक्ष?