Special Report | लता दीदींच्या अंत्यविधीवेळी कॉंग्रेस नेते कुठं होते?-tv9
भारताची गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांचं काल निधन झालं. त्यानंतर शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील नेते आणि सेलिब्रिटी हजर होते. मात्र काँग्रेसचे बडे नेते यावेळी दिसले नाहीत.
मुंबई: भारताची गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांचं काल निधन झालं. त्यानंतर शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील नेते आणि सेलिब्रिटी हजर होते. मात्र काँग्रेसचे बडे नेते यावेळी दिसले नाहीत. त्यामुळे काँग्रेसवर जोरदार टीका होत आहे. काँग्रेस नेते लतादीदींच्या अंत्यसंस्काराला का हजर राहू शकल्या नाहीत? असा सवाल केला जात आहे. त्यामुळे काँग्रेसची मोठी कोंडी झालेली असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यावर खुलासा केला आहे. आमचे अनेक नेते कोरोनाबाधित होते. त्यामुळे ते क्वॉरंटाईन असल्याने येऊ शकले नाहीत. तर मी आमच्या पाहुण्यांमध्ये एकाचं निधन झाल्याने तिकडे गेलो होतो, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. दादरच्या टिळक भवन येथे काँग्रेसच्यावतीने लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधला. आमचे बरेच नेते कोरोनाबाधित होते. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख हे सर्वजण कोरोना बाधित आहेत. त्यामुळे ते काल लता दिदींच्या अंत्यदर्शनाला हजर राहू शकले नाहीत. माझ्या बहिणीच्या सासूसुद्धा वारल्यामुळे मी तिकडे होतो. पण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि आमची टीम लतादीदींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होती, असं पटोले म्हणाले.