पोलिसांनी थातूरमातूर गुन्हे का दाखल केले? – इम्तियाज जलील

| Updated on: May 03, 2022 | 7:09 PM

औरंगाबाद: चिथावणीखोर भाषण केलं म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, राज ठाकरेंवर जे गुन्हे दाखल केले आहेत, त्याला एमआयएमचे नेते इम्तियाज जलील (imtiaz jaleel) यांनी विरोध केला आहे. मी खासदार नवनीत राणांचं (navneet rana) समर्थन करत नाही. पण नवनीत राणांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो तर […]

औरंगाबाद: चिथावणीखोर भाषण केलं म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, राज ठाकरेंवर जे गुन्हे दाखल केले आहेत, त्याला एमआयएमचे नेते इम्तियाज जलील (imtiaz jaleel) यांनी विरोध केला आहे. मी खासदार नवनीत राणांचं (navneet rana) समर्थन करत नाही. पण नवनीत राणांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो तर मग राज ठाकरेंवर तोच गुन्हा दाखल का होऊ शकत नाही. तीन दिवस भाषण तपासल्यानंतर पोलिसांनी थातूरमातूर गुन्हे का दाखल केले? थेट बोळा कोंबा, आवाज बंद करा आणि होऊन जाऊ द्या एकदाचं अशी भाषा राज ठाकरे यांनी वापरली. ही भाषा चिथावणीखोर नाही का? असा सवाल करतानाच केवळ आपला भाऊ आहे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला नाही का? असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला आहे.

Published on: May 03, 2022 07:09 PM
राज ठाकरे : काय आहे नेमकं FIR मध्ये ?
महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्शन मोडवर…