भाजप निवडणुकीला घाबरतंय, काँग्रेसच्या ‘या’ नेत्यानं केला हल्लाबोल

| Updated on: Apr 08, 2023 | 10:35 PM

VIDEO | 'भाजपा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका का करत नाहीत? कसब्याची निवडणूक हरल्याने त्यांना भिती', काँग्रेसचं जोरदार टीकास्त्र

गोंदिया : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येला गेले असून त्यावर नाना पटोले यांनी उत्तर देत यात नवीन काय, एकिकडे शेतकरी आत्महत्या आणि शेतीच्या मालाला भाव मिळत नाही, याकडे लक्ष देण्यापेक्षा अयोध्येला गेलं यामध्ये नवीन काय आम्ही सुध्दा अयोध्येला जाणार आहोत, अशी खोचक टीका काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. भाजपा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका का करत नाहीत? असा सवाल उपस्थित करत नाना पटोले म्हणाले, कसब्याची निवडणूक हरल्याने त्यांना भिती आहे. काँगेस कुणाशीही युती करणार नाही, भाजप शेतकरी विरोधी पक्ष आहे. तर दुसरीकडे स्थानिक बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी भाजप सोबत लढत असतील तर तेही शेतकरी विरोधी होतील असे म्हणत त्यांनी निशाणा साधला.

Published on: Apr 08, 2023 10:34 PM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता ‘हा’ पक्षही करणार अयोध्येचा दौरा?
अयोध्या आम्ही दाखवली म्हणणाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फटकारलं, म्हणाले…