Special Report | उमेश घरडेला गावगुंड मोदी का म्हणतात? उमेशच्या पत्नीकडून पोलखोल
काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांची क्लीप व्हायरल झाली, आणि कथीत गावगुंड मोदी म्हणजेच उमेश घरडेची महाराष्ट्रभर चर्चा सुरु झाली. “बायको सोडून गेली म्हणून लोक मला मोदी म्हणतात” असं ‘टीव्ही 9 मराठी’ शी बोलताना उमेश घरडे याने सांगीतलं होतं.
काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांची क्लीप व्हायरल झाली, आणि कथीत गावगुंड मोदी म्हणजेच उमेश घरडेची महाराष्ट्रभर चर्चा सुरु झाली. “बायको सोडून गेली म्हणून लोक मला मोदी म्हणतात” असं ‘टीव्ही 9 मराठी’ शी बोलताना उमेश घरडे याने सांगीतलं. पण पत्नी का सोडून गेली? हे जाणून घेण्यासाठी टीव्ही 9 ने उमेश घरडेच्या पत्नीशी संवाद साधला. त्या सध्या उमेश घरडेला सोडून माहेरी म्हणजेच मांडळ या गावात राहतात. अनेक वर्ष वडीलांच्या घरी राहिल्यानंतर काही महिन्यांपूर्वी त्या उमेश घरडे सोबत रहायला गेल्या. पण त्याचं दारू पिनं, मारणं हे नेहमीचंच होतं. शेवटी एक दिवस पैशासाठी त्यानं आपला गळा दाबल्याचा आरोपही त्याच्या पत्नीने केला आहे. त्यामुळे आपन त्याला कायमचे सोडून आल्याचा दावा त्याच्या बायकोने केला आहे. मात्र आता उमेश घरडे हा आपल्याला घटस्फोट देत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.