म्हणून उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पदावरून हटवलं, वैभव नाईक यांनी स्पष्टच सांगितलं
VIDEO | उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पदावरून का हटवले? वैभव नाईक यांनी स्पष्टच प्रतिक्रिया दिली... काय म्हणाले बघा
सिंधुदुर्ग : आमदार वैभव नाईक यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदावरून अशी सातत्याने भाजपकडून टीका होत आहे. तर भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी वारंवार दबाव टाकला जात असल्याची वस्तुस्थिती असल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुख पदावरून आमदार वैभव नाईक यांना हटवले. मातोश्रीवरून विधानसभा मतदारसंघ निहाय तीन नवीन जिल्हाप्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्यात. मात्र एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध असल्याने गेले काही दिवस वैभव नाईक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याने कारवाई झाल्याची जिल्ह्यात दबक्या आवाजात चर्चा होती. मात्र वैभव नाईक यांनी यावर भाष्य केले असून याला नकार दिला होता. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेर आता आपण काम करू लागल्याने या जबाबदारीतून आपणाला मुक्त करण्यात आल्याची प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.