भाई ये भी मोदी का फॅन… Modi 3.0 कॅबिनेटच्या शपथविधी सोहळ्याला बिबट्याची एन्ट्री, बघा VIDEO
pm modi oath ceremony : मोदी यांनी नुकतीच तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. हा भव्यदिव्य शपधविधी सोहळा रविवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी मोदी यांच्यासोबत तब्बल ७२ मंत्र्यांनीही शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला परदेशी पाहुण्यांसह ६ हजारांहून अधिकजण उपस्थित
नरेंद्र मोदी यांनी नुकतीच तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. हा भव्यदिव्य शपधविधी सोहळा रविवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी मोदी यांच्यासोबत तब्बल ७२ मंत्र्यांनीही शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला परदेशी पाहुण्यांसह ६ हजारांहून अधिकजण उपस्थित होते. इतकंच नाही तर या कार्यक्रमादरम्यान एक अनोळखी पाहुणाही दिसला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मिडीयावर मोदींच्या शपथविधी सोहळ्याचा अवघ्या12 सेकंदाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये मंत्री दुर्गादास उईके शपथ घेतल्यानंतर स्वाक्षरी करताना दिसत आहेत. याच वेळी त्यांच्या मागून एक वन्य प्राणी पायऱ्यांवरून जाताना दिसतोय. नेमका हा प्राणी कोणता ते स्पष्टपणे दिसत नाही… पण तो वन्य प्राणी बिबट्याचा असावा असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला असल्याचे पाहायला मिळत आहे.