अजित पवार यांच्यावर कारवाई होणार? संजय शिरसाट यांच्या मोठ्या वक्तव्यानं उडाली खळबळ
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज दुसऱ्यांदा ईडी चौकशी होत आहे. रोहित पवार यांच्या या ईडी चौकशीवर बोलताना संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केले आहे. अजित पवार यांच्यावरही कारवाई होऊ शकते, असं भाष्य संजय शिरसाट यांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगर, १ फेब्रुवारी २०२४ : रोहित पवार हे मिंधे नाहीत, त्यामुळे त्यांची ईडी चौकशी सुरू आहे. जे लोकं सरकारसोबत आलेत, त्यांच्या सगळ्यांच्या चौकश्या थांबल्यात. अजित पवार यांच्या कारखान्यातील घोळ आणि रोहित पवार यांच्या कारखान्यातील घोळ सारखाच असल्याचा खोचक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज दुसऱ्यांदा ईडी चौकशी होत आहे. रोहित पवार यांच्या या ईडी चौकशीवर बोलताना संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केले आहे. अजित पवार यांच्यावरही कारवाई होऊ शकते, असं भाष्य संजय शिरसाट यांनी केले आहे. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आलं आहे.
Published on: Feb 01, 2024 04:22 PM