2024 मध्ये स्वराज्य संघटना निवडणूक लढणार, कुणासोबत जाणार? बघा काय म्हणाले छत्रपती संभाजीराजे

| Updated on: Feb 27, 2023 | 5:49 PM

VIDEO | 2024 मध्ये स्वराज्य संघटना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? छत्रपती संभाजीराजे यांनी फुंकलं रणशिंग

धाराशिव : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी अखेर २०२४ साली निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत. धाराशिव येथे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी याबद्दल मोठं वक्तव्य केले आहे. आज धाराशिव येथे संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेच्या ५८ शाखांचं उद्घाटन करण्यात आलं. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मतदार संघातच छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघटनेच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चाणा उधान आले आहे. यावेळी त्यांनी आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच आरोग्य व्यवस्थेचे कसे हाल झाले आहेत, यावर भाष्य करत जोरदार टीका केली. यासह भूम येथील रुग्णालय महाराष्ट्रात नंबर वन हवं होतं, मात्र तशी स्थिती नाहीये, अशी खंत संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली.

Published on: Feb 27, 2023 05:48 PM
थेट सॅटेलाइटद्वारे EVM नियंत्रित करतात, ठाकरे गटाच्या नेत्यानं कुणावर केला खळबळजनक आरोप?
आदित्य ठाकरे यांच्या ब्रँडिगवर कोट्यवधी रूपये खर्च कुणी केला? शिवसेना नेत्याचा रोखठोक सवाल