PM Modi | देशात 1 लाख कोरोना योद्धा निर्माण करणार; मोदींच्या हस्ते प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ

| Updated on: Jun 18, 2021 | 2:13 PM

देशातील कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी एक लाख कोरोना योद्धा निर्माण करण्यात येणार आहेत. या कोरोना योद्ध्यांना प्रशिक्षित करण्यासाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्घाटन केलं. कोरोनाचं संकट रोखण्यासाठी या योद्धयांचा प्रचंड उपयोग होईल, असं नरेंद्र मोदी म्हणाले. 

देशातील 26 राज्यांमधील 111 ट्रेनिंग सेंटरमध्ये कोविड-19 हेल्थकेअर फ्रंटलाइन वर्कर्ससाठी ‘कस्टमाइज्ड क्रॅश कोर्स प्रोग्राम’ कोर्स तयार करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा आज शुभारंभ केला. त्यावेळी संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिली. आजपासून देशात एक लाख फ्रंट लाईन वर्कर्स तयार करण्याचं महाअभियान सुरू होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्हायरसचं बदलतं स्वरुप पाहिलं. त्यामुळे निर्माण झालेली आव्हानेही पाहिली आहेत. हा व्हायरस अजूनही आपल्यात आहे. तो पुन्हा म्युटेड होण्याची शक्यता आहे, असं मोदींनी सांगितलं.

VIDEO : Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 1 : 30 PM | 18 June 2021
Kolhapur Rain | कोल्हापुरात धरणक्षेत्रात पावसाचा जोर, पंचगंगा नदीची पाणीपातळी 34 फुटांवर