राजकीय डावपेच विसरून रक्षाबंधनानिमित्त अजित पवार-सुप्रिया पवार एकत्र येणार? काय म्हणताय दादा-ताई?
राज्याच्या राजकारणात शरद पवार यांचं मोठं नाव आहे. शरद पवार यांचं संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे सर्व सण साजरे करत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असताना दिवाळीत अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र दिवाळी साजरी केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे आता अजित पवार हे सुप्रिया सुळे यांच्यासोबत रक्षाबंधन साजरी करणार का? असा प्रश्न अनेकांना पडलाय
आज देशभरात बहिण-भावाचा सण रक्षाबंधन साजरा केला जात आहे. अशातच राजकीय वर्तुळातील नेते मंडळींकडून देखील रक्षाबंधन साजरा केलं जात आहे. सोशल मीडियावर तसे फोटोही समोर येत आहे. मात्र अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे रक्षाबंधनच्या निमित्ताने एकमेकांना भेटणार का? आणि सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्याकडून आजच्या दिवशी राखी बांधून घेणार का? याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे. आज अजित पवार हे मुंबईमध्ये आहेत तर सुप्रिया सुळे या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आज रक्षाबंधननिमित्त अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट होणार का? अशा चर्चा सुरू असताना सुप्रिया सुळे मुंबईत असतील तर राखी बांधून घेणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. मात्र मी नाशिकमध्ये आहे. कुणीही राखी बांधून घ्यायला आलं तर स्वागत करेन, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
Published on: Aug 19, 2024 12:45 PM