३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा : रायगडावरून देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

| Updated on: Jun 02, 2023 | 2:12 PM

VIDEO | एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार भरत गोगावले यांची 'ती' मागणी पूर्ण करणार, देवेंद्र फडणवीस यांनी काय दिला शब्द

रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात येणार, तसेच प्रतापगड प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आणि शिवसृष्टीसाठी 350 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. दरम्यान, यावेळी भाषण करत असताना छत्रपती शिवरायांच्या राष्ट्रीय स्मारकाबद्दल मोठी घोषणा केली आहे. दिल्ली येथे शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी लवकर मुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांना भेटणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले तर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांची रायगडावर शिवसृष्टी उभारण्याची मागणी पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

Published on: Jun 02, 2023 02:12 PM
काँग्रेसच्या आढावा बैठकीत काय चर्चा झाली? अशोक चव्हाण यांनी माहिती देत म्हणाले…
‘लवकरच जनता तुमचा कडेलोट करेल’, शिवराज्याभिषेक सोहळादिनी राज्य सरकारला इशारा