Nana Patole | OBC आरक्षण मिळेल का? याबाबत संभ्रम, नाना पटोलेंचं वक्तव्य
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळालं नाही तर काँग्रेसकडून ओबीसींच्या 30 टक्के उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट देण्यात येईल, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्व ठिकाणी ओबीसी उमेदवार देण्याची घोषणा भाजपने केली आहे. त्यापाठोपाठ काँग्रेसनेही मोठी घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळालं नाही तर काँग्रेसकडून ओबीसींच्या 30 टक्के उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट देण्यात येईल, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. (nana patole big announcement on local body election)
नागपूरमध्ये नाना पटोले यांनी ही घोषणा केली. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेल की नाही याबाबत संभ्रम आहे. आरक्षण मिळालं नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस ओबीसींना 27 टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे 30 टक्के जागा देणार, अशी घोषणा पटोले यांनी केली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींचा मुद्दा असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.