ट्रकभर पुरावे घेऊन जाऊ, ED ला ऑफिस बंद करावं लागेल : Sanjay Raut
शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी ईडीच्या चौकश्यांवरून भाजपवर (bjp) पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला. तुम्हाला आमच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स काय लावायचं ते लावा. माझं स्पष्ट आव्हान आहे.
शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी ईडीच्या चौकश्यांवरून भाजपवर (bjp) पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला. तुम्हाला आमच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स काय लावायचं ते लावा. माझं स्पष्ट आव्हान आहे. आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरत नाही. तुम्ही अशा कितीही धमक्या दिल्या तरी रिश्ते में हम आप के बाप लगते है आणि बाप काय असतो हे तुम्हाला दिसेल, असा इशारा शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत यांनी दिला. आम्ही कुणाला टार्गेट करत नाही. लोकं आमच्या हातात पुरावे आणून देत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांना तुम्ही खंडणीखोर बनवलं आहे. ती तुमची साधनं झाली आहेत. हे क्रिमिनल सिंडिकेट आहे. ते उघड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कुणाला अंगावर यायचं असेल तर या. तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर देऊ. तुम्हाला तोंड काळं करून जावं लागेल. आता बंद करा हे धंदे, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला सुनावले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.