Video | कोकणाला पुराचा फटका, कोकणी बांधवांना आधार देण्याचा सरकारचा प्रयत्न : विश्वजित कदम
मुसळधार पाऊस आणि पुरामुळे सांगली जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. यामध्ये शहरी भागातही पाणी आले असून ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट आहे.
मुंबई : मुसळधार पाऊस आणि पुरामुळे सांगली जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. यामध्ये शहरी भागातही पाणी आले असून ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट आहे. यावर राज्यमंत्री विश्विजित कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी 2019 च्या पुराच्या तुलनेत हा पूर आश्चर्यचकित करणारा आहे. पश्चिम महाराष्ट्रात मोठा पाऊस झाला. कृष्णा नदीचं पात्र छोटं आहे. त्यामुळे या पुरामुळे शेजारच्या गावांना आणि शहरांना फटका बसला. त्यामुळे कोकणी बांधवांना आधार देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे कदम यांनी सांगितलं.