Jejuri : जेजुरी देवस्थानाला वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा मिळणार?
केंद्रीय अर्थमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेवेळी देवस्थान समितीने आपलं म्हणणं मांडलं. फक्त देशातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक हे जेजुरीला येत असतात. असंख्य भाविक बाराही महिने जेजुरीला भेटी देतात.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी नुकतीच जेजुरीला भेट दिली होती. यावेळी जेजुरी (Jejuri) देवस्थानाला वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा द्या, अशी मागणी देवस्थान समितीच्या वतीने कऱण्यात आली. तसंच 300 कोटी रुपयांचा निधी विकास कामासांठी दिला जावा, अशी मागणीही त्यांनी दिलीय. शुक्रवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जेजुरी देवस्थानला भेट देऊन खंडोबाचं (Khandoba) दर्शन घेतलं होतं. त्यावेळी त्यांचं मार्तंड देवस्थान समितीच्या वतीने जोरदार स्वागतही करण्यात आलेलं. दरम्यान, देवस्थान समितीच्या सदस्यांशीही अर्थमंत्र्यांनी चर्चा केली होती. यावेळी केंद्रीय अर्थमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेवेळी देवस्थान समितीने आपलं म्हणणं मांडलं. फक्त देशातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक हे जेजुरीला येत असतात. असंख्य भाविक बाराही महिने जेजुरीला भेटी देतात. त्यामुळे देवस्थान समितीने जेजुरीला वर्ल्ड हेरीटेजचा दर्जा देण्याची मागणी केलीय. आता केंद्र सरकार देवस्थान समितीच्या मागणीबाबत काय निर्णय घेतं, हे पाहणं महत्त्वाचंय.