Pratap Sarnaik : प्रताप सरनाईक यांना दिलासा मिळणार? क्लोजर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारला!

| Updated on: Sep 16, 2022 | 10:00 AM

Pratap Sarnaik : ईओडब्ल्यूनं सादर केलेला क्लोजर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारलाय. त्यामुळे ईडीला 21 सप्टेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आता याप्रकरणी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनाही दिलासा मिळतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबई : आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना दिलासा मिळणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागलाय. कारण प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय चांदोले आणि शशिधरन यांचा दोषमुक्तीसाठी अर्ज स्वीकारण्यात आला आहे. टॉप्स ग्रुपविरोधातील (Tops Group) क्लोजर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारला आहे. ईओडब्ल्यूनं सादर केलेला क्लोजर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारलाय. त्यामुळे ईडीला 21 सप्टेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आता याप्रकरणी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनाही दिलासा मिळतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रताप सरनाईक हे देखील ईडीच्या (Pratap Sarnaik ED) कचाट्यात सापडले होते. मात्र शिंदेंसोबत बंडखोरी केल्यानंतर प्रताप सरनाईक यांनाही दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवं सरकार सत्तेत आल्यानंतर सरनाईकांबाबत समोर आलेल्या या महत्त्वपूर्ण अपडेटने राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलं आहे.

 

Published on: Sep 16, 2022 10:00 AM
Video : जालन्यानंतर आता धुळ्यातील मारुती टार्गेट! मारुती मूर्तीचा चांदीचा डोळा चोरल्यानं खळबळ
दुसऱ्या टप्यातील ‘ट्रायल रन’ला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दाखविणार हिरवा झेंडा