मनसे लवकरच महायुतीत येणार? MNS सोबत युती करण्यासाठी महायुतीची चाचपणी सुरू

| Updated on: Feb 07, 2024 | 5:54 PM

महायुतीमध्ये राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष येणार का अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वर्षा बंगला तर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर वारी देखील केली

मुंबई, ७ फेब्रुवारी २०२४ : येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका आहेत. तर महायुतीमध्ये राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष येणार का अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वर्षा बंगला तर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर वारी देखील केली आहे. अशातच लोकसभा निवडणुकीत मनसे सोबत युती करण्यासाठी महायुतीची चाचपणी सुरू आहे. मनसे नेत्यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तर मनसे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांची साधारण अर्धा तास चर्चा झाली. मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगला येथे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे येत्या काही काळात मनसे महायुतीत येणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Feb 07, 2024 05:54 PM
मग आता का वाईट वाटतंय? भाजप नेत्यानं शरद पवार यांना डिवचलं
मनसे महायुतीत येणार? शिंदे अन् फडणवीस यांच्याशी घेतलेल्या भेटीवर संदीप देशपांडे स्पष्टच म्हणाले….