Video | बैलगाडा शर्यत होणारच, गोपीचंद पडळकर यांचा इशारा
येत्या 20 तारखेला बैलगाडी शर्यत होणारच असं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय ते सांगलीच्या झरे येथे बोलत होते. शेतंकऱ्याची खिलार गाय आणि गोवंश वाचवायला पाहिजे. बैलगाडा शर्यतीवर असंख्य कुटुंबं चालतात, असं पडळकर यांनी म्हटलंय.
मुंबई : येत्या 20 तारखेला बैलगाडी शर्यत होणारच असं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय ते सांगलीच्या झरे येथे बोलत होते. शेतंकऱ्याची खिलार गाय आणि गोवंश वाचवायला पाहिजे. बैलगाडा शर्यतीवर असंख्य कुटुंबं चालतात. त्यांना आधार मिळावा यासाठी येत्या 20 ऑगस्ट रोजी भव्य छकडा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. पण या शर्यतीला हजारोच्या संख्येने पोलीस फोजफाटा तैनात केला आहे. बैलगाडी विषयी ज्यांनी प्रेम दाखवले त्यांनी हे राजकारण थांबवावे. बैलगाडा शर्यत ही होणारच आणि येत्या 20 ऑगस्टला अनेकांची बुरखे टराटरा फाडली जाणार, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.