तर देशात आंदोलन करणार, मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला पुन्हा थेट इशारा काय ?
अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे तर अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नाही तर.... काय दिला जरांगे पाटलांनी सरकारला इशारा?
जालना, १२ फेब्रुवारी, २०२४ : सलग तिसऱ्या दिवशीही मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरूच आहे. सलग तिसऱ्या दिवशी उपोषण सुरूच असल्याचे त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. तर कुणबी मराठ्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांच्या मसुद्यात अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे तर अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नाही तर देशात आंदोलन करू, असा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. येत्या १५ फेब्रुवारीला अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही तर महाराष्ट्रात काय होतं ते समजेल? असेही जरांगे पाटील यांनी म्हटलंय.
Published on: Feb 12, 2024 11:22 PM