शिवसेनेच्या सभेत रामदास कदम अनुपस्थित राहणार?
14 मे रोजी उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी रामदास कदम यांना निमंत्रण आल्याची माहिती खुद्द कदम यांनीच दिलीय. मला उद्धव ठाकरे यांचा निरोप मिळाला आहे. मला 14 मे च्या सभेसाठी बोलावणं आलं आहे, अशी माहिती कदम यांनी दिली आहे. मात्र, आपण त्या सभेला जाणार नसल्याचंही कदम यांनी यावेळी सांगितलं.
एका ऑडिओ क्लिपमुळे (Audio Clip) मागील काही दिवसांपासून ‘मातोश्री’च्या वक्रदृष्टीमुळे माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) राज्याच्या राजकारणापासून दुरावले गेल्याचं पाहायला मिळत होतं. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर अनेक आरोप करणाऱ्या रामदास कदम यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. तेव्हापासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कदम यांच्यावर नाराज होते. 14 मे रोजी उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी रामदास कदम यांना निमंत्रण आल्याची माहिती खुद्द कदम यांनीच दिलीय. मला उद्धव ठाकरे यांचा निरोप मिळाला आहे. मला 14 मे च्या सभेसाठी बोलावणं आलं आहे, अशी माहिती कदम यांनी दिली आहे. मात्र, आपण त्या सभेला जाणार नसल्याचंही कदम यांनी यावेळी सांगितलं.
Published on: May 14, 2022 11:23 AM