Special Report | भाजपसोबत संभाजी ब्रिगेडची युती होणार का?
संभाजी ब्रिगेडला सत्ता हस्तगत करायची आहे. संभाजी ब्रिगेडला खूप मर्यादा येतात. स्वबळ अवघड आहे. शेवटी भाजपशी युती हाच पर्याय उरतो. तसं संभाजी ब्रिगेडपेक्षा वेगळ्या अर्थानं भाजपला अस्पृश्य मानले जाते.
मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी लिहिलेल्या लेखाने राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. टोकाचा विरोध असलेल्या भाजपसोबत युती करण्याचं भाष्य पुरुषोत्तम खेडेकर यांनी केलं आहे. भाजपसोबत युती हाच पर्याय असं पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलं आहे. मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘मराठा मार्ग’ या मासिकामध्ये संपादकीय लेख लिहिला आहे. या लेखामध्ये भाजपसोबतच्या युतीची भूमिका मांडली.
पुरुषोत्तम खेडेकर यांनी आपल्या लेखात नेमकं काय म्हटलंय?
कुणबी मराठा बहुजन समाजातील स्थिरस्थावर बंधू-भगिनींनी सामाजिक बांधिलकी व कृतज्ञता म्हणून गरजवंतांना कौशल्य, बुद्धी, श्रम, पैसा व वेळ खर्च करून त्यांना आजच्या जागतिकीकरणाच्या रेट्यात स्वावलंबी होण्यासाठी सहकार्य करावे, अशी मराठा सेवा संघाची संकल्पना आहे, हेच तत्व आहे. परंतु अलीकडे या कामात शिथिलता आली आहे, असं लक्षात येतं. हे कार्य सर्वांगाने गतिमान करून नव्याने समाज उभा करणे आवश्यक आहे. पंचसूत्री कार्यक्रम राबविण्यात आले पाहिजेत.