Special Report | समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ ?
क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खान केसचा तपास एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून याआधीच काढून घेण्यात आला आहे.
संपूर्ण देशभर मागील महिनाभरापासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाची चर्चा सुरु आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यावरील आरोपांवरुन हे प्रकरण चांगलच गाजलं होतं. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास आधी समीर वानखेडे यांच्याकडे होता. जो नंतर काढून घेण्यात आला. मात्र आता एनसीबीच्याच काहींकडून आर्यन खान प्रकरणात 50 लाख रुपयांची देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर आणली आहे. समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होणार का? या सर्वासंबधी हा स्पेशल रिपोर्ट…