आरक्षणाचा वाद सोडवण्यासाठी शरद पवार पुढाकार घेणार? भुजबळांना दिला शब्द, म्हणाले…
काल शरद पवार यांच्यावर आरोप केल्यानंतर आज त्यांच्या निवासस्थानी छगन भुजबळ भेटीसाठी दाखल झाले होते. यावेळी राज्यातील वाद मिटवण्यासाठी आता तुम्हीच पुढाकार घ्या, अशी विनंती भुजबळांनी केली. भुजबळ म्हणाले, आम्ही काही हाके आणि उपोषण करणाऱ्यांना उपोषण सोडायला सांगितलं....
राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात आरक्षणावरुन वाद सुरू आहे. काल शरद पवार यांच्यावर आरोप केल्यानंतर आज त्यांच्या निवासस्थानी छगन भुजबळ भेटीसाठी दाखल झाले होते. यावेळी राज्यातील वाद मिटवण्यासाठी आता तुम्हीच पुढाकार घ्या, अशी विनंती भुजबळांनी केली. भुजबळ म्हणाले, आम्ही काही हाके आणि उपोषण करणाऱ्यांना उपोषण सोडायला सांगितलं. उपोषण करून वातावरण तंग करून चर्चा होणार नाही. चर्चा करून मार्ग काढू एवढंच आम्ही सांगितलं. तसेच जरांगेंना जे मंत्री भेटले त्यांनी त्यांना काय सांगितलं हे मला माहीत नाही, ते तुम्ही विचारलं पाहिजे, असं मी शरद पवार यांना म्हणालो. मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे. तुम्ही आज राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. सर्व समाज घटकांची गावागावात जिल्ह्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे याचा तुमचा अभ्यास आहे. आम्ही मुख्यमंत्री झालो, मंत्री झालो म्हणजे याचा आम्हाला अभ्यास आहे असं समजण्याचं कारण नाही. त्यामुळे तुम्ही यात पुढाकार घेतला पाहिजे, असे म्हणत भुजबळांनी साकडं घातलं.