EP3: Bas Evdhach Swapna | स्वयंरोजगार करणाऱ्यांची स्वप्नं बजेटमधून पूर्ण होतील?

| Updated on: Jan 28, 2022 | 4:33 PM

विदर्भातील नागपूरच्या सुजीत पटेल यांनी केंटरिगंचा व्यवसाय (Catering Service) करतात. 2005 मध्ये त्यांनी मोठ्या आशेनं ‘फ्लेवर्स केटरर्स’ सुरू केले . एक टीम तयार करून लग्न आणि इतर समारंभात केटरिंगचं काम सुरू होतं. त्यांच्यामुळे अनेकांना रोजगारही मिळाला होता.

विदर्भातील नागपूरच्या सुजीत पटेल यांनी केंटरिगंचा व्यवसाय (Catering Service) करतात. 2005 मध्ये त्यांनी मोठ्या आशेनं ‘फ्लेवर्स केटरर्स’ सुरू केले . एक टीम तयार करून लग्न आणि इतर समारंभात केटरिंगचं काम सुरू होतं. त्यांच्यामुळे अनेकांना रोजगारही मिळाला होता. तीन ते चार वर्ष सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. व्यवसाय स्थिरावल्यानं आयुष्यात थोडी स्थिरता आली होती. सुजीतचे कुटुंब मध्यमवर्गीय आहे. त्यांच्याकुटुबात तीन सदस्य आहे. मात्र, 2020 मध्ये कोरोनाच्या(Covid -19) कहर सुरू झाला आणि सर्व काही ठप्प झालं सगळ्यात वाईट परिस्थिती सुजितसारख्या स्वयंरोजगार(Selfemployed) करणाऱ्यांवर आली. कोरोनाच्या अगोदर प्रत्येक महिन्यात किमान दोन ऑर्डर सुजितला मिळत होते. खर्च वजा जाता 40 ते 50,000 रुपये उरत होते सुजीतचं एक हॉटेल सुरू करण्याचं स्वप्न होतं. मात्र, आता कोरोनामुळे समारंभावर बंदी आलीय. सुजीतचे सगळे ग्राहक मध्यमवर्गीय आहेत. कोरोनामुळे त्यांचंही आर्थिक गणित बिघडल्यानं सुजितला मोठ्या मुश्किलीनं दोन महिन्यातून एखाद्या समारंभाची ऑर्डर मिळते. बचत संपलीय, मोठ्या कॅटरर्सकडे करारावर कामही न मिळाल्यानं सुजीतनं त्याच्या परिसरात होम डिलीवरी नेटवर्क सुरू केलंय. मात्र, या व्यवसायातून मोठ्या मुश्किलीनं 10,000 रुपयेसुद्धा मिळत नाहीत.

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines
आम्ही पुन्हा सभागृहात आमचा आवाज बुलंद करू – Bunty Bhangadia