Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या शस्त्रक्रियेमुळं हिवाळी अधिवेशन मुंबईत होण्याची शक्यता

| Updated on: Nov 21, 2021 | 6:38 PM

मुख्यमंत्र्यांच्या शस्त्रक्रियेमुळं विधीमंडळाचं नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन मुंबईत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (winter session of the Legislature is likely to be held in Mumbai)

राज्यातील विधान परिषद निवडणुका 10 डिसेंबरला होत आहे. त्यामुळे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्याची मागणी सर्व राजकीय पक्षांनी केलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक झाल्यावर हिवाळी अधिवेशन मुंबई किंवा नागपूर, कुठे आणि कधी धेणारे हे अधिकृतरित्या जाहीर करणार, अशी माहिती मिळतेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळतेय. विधान परीषदेच्या निवडणुका येत्या 10 डिसेंबरला होत आहेत. त्यामुळे सर्व पक्षांची मागणी आहे की हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलावं. त्यामुळे हिवाळी अधिवेशन पुढे ढकललं जाणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक झाल्यावर हिवाळी अधिवेशन मुंबई किंवा नागपूर कुठे आणि कधी घेणार हे अधिकृत जाहीर करणार. सध्या सूत्रांच्या माहीती नुसार हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्यात येईल अशी माहिती मिळतेय. मुख्यमंत्र्यांच्या शस्त्रक्रियेमुळं हिवाळी अधिवेशन मुंबईत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Published on: Nov 21, 2021 06:06 PM
महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केंद्र सरकारने थांबवावे – Nana Patole
Maharashtra | अमरावती, नांदेड, मालेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्रात उद्या भाजपचं धरणे आंदोलन