वंचित उमेदवाराची माघार, भाजपची वाढणार डोकेदुखी तर काँग्रेसला कसा मिळणार दिलासा?

| Updated on: Apr 23, 2024 | 10:41 AM

काही उमेदवारीवरून वाद झाला असताना वंचितच्या दोन उमेदवारांनी आता माघार घेतली आहे. भाजपला फायदा होऊ नये, यासाठी सोलापूरचा उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेतली आहे. तर आपल्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून येण्याचा सूर असल्याने वंचित उमेदवारांची माघार

सोलापुरात वंचितच्या उमेदवाराने माघार घेतली आहे. यामुळे भाजपची डोकेदुखी वाढू शकते तर काँग्रेसला दिलासा मिळू शकतो. काही उमेदवारीवरून वाद झाला असताना वंचितच्या दोन उमेदवारांनी आता माघार घेतली आहे. भाजपला फायदा होऊ नये, यासाठी सोलापूरचा उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेतली आहे. तर आपल्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून येण्याचा सूर असल्याने जळगावचा उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी माघार घेतली आहे. तर अमरावतीत वंचितच्या काही पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीच्या योग्यतेच्या निकषावर काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंना पाठिंबा दिला. सोलापूरमधील वंचितच्या उमेदवाराने घेतलेली माघार ही काँग्रेससाठी फायद्याची तर भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. कारण २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत एमआयएम वंचितच्या युतीने घेतलेल्या मतामुळे भाजपचा विजय सोपा झाला होता. बघा नेमकं २०१९ च्या निवडणुकीत काय घडलं होतं?

Published on: Apr 23, 2024 10:41 AM
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, चहाच्या टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन अन्…
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, … तेव्हा चूक झाली, आता यापुढं होणार नाही