Special Report | पंचामुळेच समीर वानखेडे यांची पंचाईत झाली का?

| Updated on: Oct 25, 2021 | 9:30 PM

पहिल्या दिवसापासून ज्या पंचांमुळे ड्रग्ज पार्टीची कारवाई वादात होती त्याच पंचांमुळे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची पंचायत होताना दिसतेय. साक्षीदारांपैकी एक असलेल्या प्रभाकर साईल याने खंडणीचे आरोप केल्यानंतर खुद्द समीर वानखेडे यांची चौकशी होणार असल्याचं बोललं जात आहे.

पहिल्या दिवसापासून ज्या पंचांमुळे ड्रग्ज पार्टीची कारवाई वादात होती त्याच पंचांमुळे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची पंचायत होताना दिसतेय. साक्षीदारांपैकी एक असलेल्या प्रभाकर साईल याने खंडणीचे आरोप केल्यानंतर खुद्द समीर वानखेडे यांची चौकशी होणार असल्याचं बोललं जात आहे. यावरुन राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच एनसीबीने क्रुझवर मारलेल्या धाडीतील प्रभाकर साईल साक्षीदार आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल करून एनसीबीचा भांडाफोड केला होता. त्यानंतर ते संपर्काबाहेर होते. कालही त्यांना मुंबईच्या बाहेर राहावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी थेट समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. याच प्रकरणावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Special Report | समीर वानखेडे नेमके हिंदू की मुस्लीम?
Special Report | समीर वानखेडेंच्या अडचणीत आर्यन आणि अनन्याला फायदा?