Ulhasnagar | उल्हासनगरमध्ये कौटुंबिक वादातून महिलेनं जाळली दुचाकी

Ulhasnagar | उल्हासनगरमध्ये कौटुंबिक वादातून महिलेनं जाळली दुचाकी

| Updated on: Dec 11, 2021 | 6:38 PM

दुचाकी जाळण्याची ही घटना सीसीटीव्हीत सुद्धा कैद झाली. याप्रकरणी शर्मा यांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता दुचाकी जाळणाऱ्या दोघांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचं समोर आलं.

उल्हासनगर : उल्हासनगरच्या कॅम्प 2 मधील ओटी सेक्शन परिसरात गोपाळ शर्मा वास्तव्याला आहेत. 9 डिसेंबरच्या पहाटे त्यांच्या घराबाहेर उभी असलेली त्यांची ऍक्टिव्हा दुचाकी दोन अज्ञात इसमांनी पेटवून देत पळ काढला. या आगीमुळे शर्मा यांच्या घराचंही काही प्रमाणात नुकसान झालं. दुचाकी जाळण्याची ही घटना सीसीटीव्हीत सुद्धा कैद झाली. याप्रकरणी शर्मा यांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता दुचाकी जाळणाऱ्या दोघांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचं समोर आलं. ही महिला गोपाळ शर्मा यांची नातेवाईक असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. घरगुती वादातून हा प्रकार केल्याची कबुली या महिलेनं दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Nawab Malik | ईडीने जर सोमय्यांना त्यांचा प्रवक्ता बनवला असेल तर तसं अधिकृतरित्या जाहीर करावं
Narayan Rane Live | संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे? : नारायण राणे