विधवा महिलांसाठी गंगा भागीरथी हा शब्द न घेता पूर्नांगिनी शब्द घ्यावा, कुणी केली शिफारस?

| Updated on: Apr 13, 2023 | 9:53 PM

VIDEO | महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा राज्यातील विधवा महिलांच्या नावाआधी गंगा भागीरथी लावण्याचा प्रस्ताव, राज्य महिला आयोगाची काय भूमिका?

मुंबई : विधवा स्त्रियांना गंगा भागीरथी म्हटले पाहिजे, असे म्हणत विधवांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हा नवा शब्द सुचवला. त्यांनी बुधवारी प्रधान सचिवांना या संदर्भात एक पत्र लिहिलं. यावर काही सामाजिक व महिला कार्यकर्त्यांनी टीका केली आहे. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तर नवीच भूमिका मांडली आहे. अशा महिलांना विधवा, गंगा भागीरथी ऐवजी पूर्नांगिणी हा शब्द लावाला, अशी सूचना त्यांनी केली आहे. रुपाली पाटील चाकणकर यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, ‘राज्य महिला आयोगाने ८ मार्च रोजी शासनाला शिफारस केली आहे. विधवा शब्द काढा आणि पूर्नांगिणी हा शब्द घ्यावा. गंगा भागिरथी हा शब्द महिला आयोगाने सुचवलेला नाही, या शब्दाला आयोगाचा विरोध आहे. गंगा भागिरथी शब्द घेताना यामागची भूमिका काय हे सांगावं, महिलेच्या नावापुढचा शब्द सकारात्मक असावा, जनतेतून मागणी आली त्याचा आधार घेऊन आम्ही शिफारस केली. गंगा भागिरथी हा शब्द न घेता सकारात्मक शब्द घ्यावा, असा आम्ही सल्ला दिल्याचं रुपाली पाटील चाकणकर यांनी म्हटलंय.

Published on: Apr 13, 2023 09:53 PM
‘हू इज बाळासाहेब? असंही विचारलं जाईल’, आदित्य ठाकरे यांचा कुणावर घणाघात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार, पण कुठे ?