Akola | अकोल्यात कौटुंबिक वादातून पतीवर कैचीने जीवघेणा हल्ला
‘पती दारु पिऊन सतत त्रास देतो, मारहाण करतो… गेले कित्येक दिवस अशा त्रासाला सामोरं जावं लागलंय’, असं सांगत वैतागलेल्या पत्नीने तिच्या पतीवर जीवघेणा हल्ला केला. या महिलेने हातात कात्री घेऊन तिच्या पतीला जखमी केलं. अकोला शहरातील ही घटना आहे.

अकोला शहरात रात्रीच्या सुमारास कौटुंबिक वादातून पत्नीकडून पतीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. शहरातल्या मोठी उमरी भागातल्या शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पती-पत्नीचं जोरदार भांडण झालं.
दारू पिऊन पती मारत असतो असे ती महिला सांगत होती… म्हणून त्याला मी आज रोडवर सर्वांसमोर मारत असल्याचे संबंधित पत्नी उपस्थितांना सांगत होती…यावेळी महिलेने हातात कैची घेऊन तिच्या पतीला जखमी केले असून संबंधित पती – पत्नी नेमके कुठले आहेत,आणि कोण आहेत?, हे अद्याप कळू शकले नसून स्थानिक नागरिकांनी मध्यशी केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
Published on: Aug 13, 2021 11:55 AM