बदलापुरातील घटनेवर महिला-बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “शाळांमध्ये असे प्रकार…”
बदलापुरातील नामांकित शाळेत दोन चिमुकलींव लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या गेटवरच पालकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.तर दुसरीकडे संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकातही रेल रोको केल्याचे पाहायला मिळत आहे. साधारण दोन तासांपासून कल्याण ते कर्जत रेल्वे सेवा ठप्प झाली आहे.
बदलापूर येथील धक्कादायक प्रकरणावर महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना निदंनीय आणि दुर्दैवी आहे. जिल्हा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेतील आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली, पुढे त्या असेही म्हणाल्या, शाळा प्रशासनावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. मात्र अशा प्रकारच्या घटना शाळांमध्ये घडणं हे दुर्दैवी आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी गृहविभागाकडे आम्ही करणार आहोत, असेही आदिती तटकरे म्हणाल्या. तर पालक आपल्या मुलांना त्या-त्या संस्थेतील लोकांच्या विश्वासावर शिक्षणासाठी पाठवत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना जर शाळेतच घडत असेल तर पालकांना धक्का बसणं सहाजिक आहे. त्यामुळे भितीचं वातावरण पालकांमध्ये निर्माण झाल्याचेही आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.