Thane | उल्हासनगरात चक्क महिला बनल्या जुगारी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील सेक्शन 22 मध्ये एका घरात महिलांचा जुगाराचा अड्डा भरत असल्याची गोपनीय माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी महिला पोलिसांना सोबत घेत या अड्ड्यावर धाड टाकली.
ठाणे : उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील सेक्शन 22 मध्ये एका घरात महिलांचा जुगाराचा अड्डा भरत असल्याची गोपनीय माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी महिला पोलिसांना सोबत घेत या अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी सात महिला पैसे लावून जुगार खेळत असल्याचं पोलिसांना आढळून आलं. त्यांच्याकडून 47 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.