Ladki Bahin Yojana : ‘त्या’ जाहिरातीवरील फोटोवर महिलांचा आक्षेप, तक्रारीनंतर भाजप नेता म्हणाला; दिलगिरी व्यक्त करतो पण…
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर संमतीशिवाय फोटो लावल्याचा आरोप त्या फोटोतील महिलांनी केला आहे. दरम्यान, महिलांनी केलेल्या तक्रारीनंतर पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नेमकं काय म्हणाले बघा व्हिडीओ...
पुण्यातील भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सिद्धार्थ शिरोळे हे पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून त्यांच्याविरोधात महिलांनी पोलिसांत एक तक्रार केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर संमतीशिवाय फोटो लावल्याचा आरोप त्या फोटोतील महिलांनी केला आहे. दरम्यान, महिलांनी केलेल्या तक्रारीनंतर सिद्धार्थ शिरोळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, या योजनेची जाहिरात करण्यासंदर्भातील कंत्राट मी जाहिरात कंपन्यांना दिली होती. पण ज्या महिलांचा या योजनेच्या पोस्टर, बॅनरवर फोटो आहे, त्यांचे फोटो या अगोदर सुद्धा अनेक जाहिरात वापरण्यात आले आहेत आणि या महिला बिड जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली. तर शटर स्टॉक या संकेतस्थळावर हे फोटो आहेत. २०१६ साली काढलेल्या या फोटोचे मालकी हक्क हे त्या फोटोग्राफरकडे आहे. तरी त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असेही आमदार सिद्धार्थ शिरोळे यंनी म्हटले आहे.