St sangli : सांगलीतल्या महिला एसटी कर्मचारी कामावर रूजू, हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता
सांगलीतल्या महिला एसटी कर्मचारी कामावर रुजू झाल्या आहेत. त्यामुळे हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या संपानंतर एसटी डेपो ओस पडला होता.
सांगलीतल्या महिला एसटी कर्मचारी कामावर रुजू झाल्या आहेत. त्यामुळे हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या संपानंतर एसटी डेपो ओस पडला होता. रस्त्यावर कुठेही लालपरी दिसत नव्हती. त्यानंतर बैठकावर बैठका झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतरही संपावर तोडगा निघत नव्हता, कारण एसटी कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी विलीनीकरणाची होती. पण सरकारनं मोठी पगारवाढ करून एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं. आजही परिवहन मंत्री अनिल परबांनी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यास सांगितलं. त्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे.