जंतर-मंतरवरील मध्यरात्रीच्या ‘त्या’ राड्यानंतर पोलीस सतर्क, पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह परिसरही केला निर्मनुष्य
VIDEO | दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त तैनात, परिसरात कलम 144 लागू आता काय घडलं?
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या जतंर मंतर या मैदानावर गेल्या काही दिवसांपासून कुस्तीपटुंचं आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनस्थळी मध्यरात्री एक मोठा राडा झाल्याचे समोर आले. मध्यरात्री कुस्तीपटू, पोलीस आणि काही राजकीय नेत्यांध्ये मोठा वादनिर्माण झाला. त्यानंतर नवी दिल्ली पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. या घडलेल्या हाय होल्टेज ड्रामानंतर सध्या जंतर-मंतरचा संपूर्ण परिसर हा निर्मनुष्य करण्यात आला आहे. जंतर-मंतर परिसरात पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर पोलिसांनी जागो-जागी बॅरिकेटिंग करून सर्व रस्ते बंद केले आहेत. माध्यमांच्या ओबी व्हन्स आणि गाड्याही एक किलोमीटर लांब हलवल्याचे सांगितले जात आहे. काल मध्यरात्रीच्या राड्यानंतर दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर आहे.तर या आंदोलन परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. 3 मे ला कुस्तीपटूंकडून बंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयात कागदपत्र सादर करण्यात आले आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयात सॉलिटर जनरल तुषार महेता यांनी कागदपत्र सादर करण्यास विरोध केला होता. दरम्यान या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.