दिल्लीच्या जंतर- मंतरवर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, वादाचं कारण काय?

| Updated on: May 04, 2023 | 8:00 AM

VIDEO | दिल्लीच्या जंतर मंतरवर गेल्या दिवसांपासून कुस्तीपटुंचं आंदोलन, यादरम्यान कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये तू-तू, मै-मै; बाचाबाचीचं कारण काय?

दिल्ली : दिल्लीच्या जंतर- मंतर मैदानावर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर कुस्तीपटुंचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान, आपचे नेते पैलवानांसाठी बेड घेऊन जात असताना ही बाचाबाची झाली. आपच्या नेत्यांना पोलिसांनी रोखलं असताना हा राडा दिल्लीच्या जंतर- मंतर मैदानावर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, कुस्तीपटूंनी पोलिसांवर मारहाण केल्याचा आरोपही केल्याचे पाहायला मिळाले. बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. अनेक दिवसांपासून हे प्रकरण तापलं आहे. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंचे गेल्या आठवड्याभरापासून जंतर-मंतरवर आंदोलन सुरू आहे. या प्रकरणात कुस्तीपटूंना दिग्गज आजी-माजी खेळाडूंचा पाठिंबा मिळतोय. त्यामुळे हा विषय सोशल मीडियावरही गाजतोय. हे कुस्तीपटू गेल्या अनेक दिवसांपासून जंतरमंतर इथे सामूहिक उपोषणाला बसले आहेत.

राष्ट्रवादीत अध्यक्षांचा राजीनामा, जुंपली मात्र राऊत आणि पटोले यांच्यात? काय कारण?
राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न, रशियाचा मोठा दावा