Mumbai | मुंबईत कोस्टल रोडच्या कामाला वेग, 1 किमीचा टप्पा पूर्ण
मुंबईतील कोस्टल रोडच्या कामाला वेग आला आहे. भारतातील सर्वात मोठा बोगदा खणणाऱ्या मावळा संयंत्राने २ किलोमीटरपैकी 1 किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे. या किनारी रस्ता प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प 4 अधिक 4 मार्गिकेचा असून, दक्षिण कोस्टल रोड प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाण पुलापासून ते वांद्रे वरळी पुलाच्या दक्षिण टोकापर्यंत आहे.
मुंबईतील कोस्टल रोडच्या कामाला वेग आला आहे. भारतातील सर्वात मोठा बोगदा खणणाऱ्या मावळा संयंत्राने २ किलोमीटरपैकी 1 किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे. या किनारी रस्ता प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प 4 अधिक 4 मार्गिकेचा असून, दक्षिण कोस्टल रोड प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाण पुलापासून ते वांद्रे वरळी पुलाच्या दक्षिण टोकापर्यंत आहे. याची तीन भागात विभागणी केली आहे. प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलापासून ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत रेक्लेमेशन, बोगदे, पूल तयार करून रस्ता, प्रोमेनाईड, बगीचे, वाहनतळ, बस डेपो व इतर नागरी सुविधांचा समावेश आहे. सध्याच्या किनाऱ्यापासून सुमारे 70 ते 100 मीटर रुंदीचा भराव करण्यात येत आहे.