बापासाठी पोराचं काळीज तिळतिळ तुटलं… माधव भंडारी यांच्या मुलाची भावूक पोस्ट; ’50 वर्षे पक्षाचं काम पण 12 वेळा अपेक्षाभंग…’
भाजपकडून माधव भंडारी यांच्या नावाची चर्चा होती, मात्र त्यांना तिकीट दिले नाही. त्यामुळे माधव भंडारी यांचा मुलगा चिन्मय भंडारी निराश होत त्याने एक ट्वीट केलंय. १२ वेळा वडिलांचं नाव चर्चेत पण उमेदवारी नाही. १२ वेळा चर्चा आणि १२ वेळा अपेक्षाभंग....
मुंबई, १६ फेब्रुवारी २०२४ : राज्यसभेच्या महाराष्ट्रात सहा जागांसाठी सात अर्ज दाखल झाले होते. भाजपने अशोक चव्हाण, अजित गोपछडे, मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासोबतच चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. दरम्यान, भाजपने उमेदवारांसाठी अनेक नावांची चर्चा केली होती. यामध्ये विनोद तावडे, पंकजा मुंडे, माधव भंडारी आणि हर्षवर्धन पाटील यांचा समावेश होता. यावेळीही भाजपकडून माधव भंडारी यांच्या नावाची चर्चा होती, मात्र त्यांना तिकीट दिले नाही. त्यामुळे माधव भंडारी यांचा मुलगा चिन्मय भंडारी निराश होत त्याने एक ट्वीट केलं यामध्ये त्यांना असं म्हटलं की, १२ वेळा वडिलांचं नाव चर्चेत पण उमेदवारी नाही. १२ वेळा चर्चा आणि १२ वेळा अपेक्षाभंग….तर या भावनिक पोस्टवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलंय. माधव भंडारी आमचे नेते आहेत तर त्यांना योग्य वेळी सगळं मिळेल असे ते म्हणाले.