मैदानात कमावलं पण टीम ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनं ‘त्या’ एका कृत्यानं सारं काही गमावलं

| Updated on: Nov 21, 2023 | 12:08 PM

tv9 Marathi Special Report | विश्वचषकाबरोबर ऑस्ट्रेलिया संघाने माजोरडेपणामध्येही विश्वचषक जिंकल्याची टीका सध्या सोशल मीडियावर होत आहे. मैदानात जे कमावलं ते बाहेर फक्त एका फोटोतून गमवल्याची टीका होतेय. विजय मिळवायला नव्हे तर विजय पचवायला ताकद लागते तर सामना जिंकण्याबरोबर माज करण्याची ऑस्ट्रेलियाची परंपराही कायम

मुंबई, २१ नोव्हेंबर २०२३ : विश्वचषकाबरोबर ऑस्ट्रेलिया संघाने माजोरडेपणामध्येही विश्वचषक जिंकल्याची टीका सध्या सोशल मीडियावर होत आहे. मैदानात जे कमावलं ते बाहेर फक्त एका फोटोतून गमवल्याची टीका होतेय. ऑस्ट्रेलिया संघाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला असला तरी ऑस्ट्रेलिया संघावर असणारा माजोरडेपणाचा शिक्का कधीच पुसता आलेला नाही. त्यातच यंदा भर घातली आहे ती म्हणजे मिशेल मार्शनं…विश्वचषक जिंकल्यावर मैदानात ऑस्ट्रेलियन संघाने जल्लोष केला. रूममध्ये पोहोचल्यानंतर फोटोसेशन झालं. मात्र मिशेल मार्शनं ट्रॉफिवर पाय ठेवून फोटो काढला. ज्यामुळे भारतच नाही तर जगभरातील क्रिकेटप्रेमींनी रोष व्यक्त केलाय. विजय मिळवायला नव्हे तर विजय पचवायला मोठी ताकद लागते जर मिळालेल्या फळाचा सन्मान झाला नाही तर कालांतराने लोक त्यासाठी तुम्ही घेतलेले कष्टही विसरतात, असे म्हणत नेटकऱ्यांनी राग व्यक्त केलाय.

Published on: Nov 21, 2023 12:08 PM