Verul Caves Waterfall : प्रतीक्षेनंतर ओसंडून वाहू लागला वेरूळ लेणीचा सीता न्हाणी धबधबा, बघा रौद्ररूप

| Updated on: Sep 02, 2024 | 3:31 PM

गेल्या अनेक दिवसापासून छत्रपती संभाजीनगर शहर, जिल्ह्यामध्ये पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी हा संकटात सापडला होता. तर धबधबे देखील कोरडे पडले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाने पुन्हा कमबॅक केलं आहे. त्यामुळे वेरूळ लेणीचा सीता न्हाणी धबधबा पूर्ण क्षमतेनें प्रवाहित झाला आहे.

Follow us on

छत्रपती संभाजीनगर येथे असणाऱ्या वेरूळ लेणीतील धबधबा आता पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही तासांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने वेरूळ लेणीतील सीता न्हाणी धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. मुसळधार पावसामुळे हा धबधबा ओसंडून वाहत आहे. त्यामुळे या सीता न्हाणी धबधब्याला रौद्र रूप प्राप्त झालंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे या धबधबा मोठ्या प्रवाहाने उंचावरून खाली कोसळतांना दिसतोय. सध्या या सीता न्हाणी धबधब्याला प्राप्त झालेले रौद्र रूपाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासोबतच जगप्रसिद्ध आणि ऐतिहासिक अजिंठा लेणीचा धबधबा मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहू लागल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर छत्रपती संभाजीनगर येथे पावसाची संततधार सुरू झाली आहे. त्यामुळे अजिंठा लेणीचा धबधबा हा पुन्हा प्रवाहित झाल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. तर हा धबधबा ओसंडून वाहू लागल्याने पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. बघा व्हायरल होणार व्हिडीओ…