Worli Election Result 2024 : वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात महायुतीने मिलिंद देवरा तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संदीप देशपांडे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं अशातच वरळीमध्ये पोस्टल मतमोजणी सुरु झाली आहे, पहिला कल हाती आला आहे.
विधानसभा निवडणुकीचे निकाल हळू हळू सुरू येण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघात हायव्होल्टेज लढती झाल्यात त्यापैकी वरळी विधानसभेकडे देखील पाहिले जाते. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात महायुतीने मिलिंद देवरा तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संदीप देशपांडे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं अशातच वरळीमध्ये पोस्टल मतमोजणी सुरु झाली आहे, पहिला कल हाती आला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून उद्घव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंना विधानसभेच्या मैदानात उतरले होते. त्यावेळी महाराष्ट्र् नवनिर्माण सेनेतर्फे आदित्य ठाकरेंना पाठिंबा देण्यात आला होता. मात्र यंदा मनसेकडून राज ठाकरे यांनीही आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचा उमेदवार उतरवला. त्यामुळे येथे चुरशीची लढत पाहायला मिळाली. अशातच तगडी फाईट देणारा चेहरा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मिलिंद देवरा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. त्यामुळे विजयी कोण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.